हृता दुर्गुळेचा ‘कमांडर करण सक्सेना’मधील दमदार लुक

Hrutha Durgule | अभिनेत्री हृता दुर्गुळे ‘फुलपाखरू’ या मालिकेतून घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मालिकांसह हृताने नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. यानंतर तिने बॉलिवूडमधून ओटीटी क्षेत्रातही डेब्यू केले आहे.
‘कमांडर करण सक्सेना’ या सीरीजमध्ये हृता एका महिला पोलिसाच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. या वेबसिरिजमधील भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. याची एक झलक तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर हृताने सीरीजच्या शुटिंग दरम्यानचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती स्टंट आणि धडाकेबाज ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. यामध्ये ती एका गुंडाचा पाठलाग करत त्याला मारताना दिसत आहे. यापूर्वी हृताला रोमँटिक, सोज्वळ अशा भूमिकांमध्ये अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र यावेळी तिचा हा वेगळा धडाकेबाज अंदाज अनेकांची पसंती पडत आहे. Hrutha Durgule |
‘कमांडर करण सक्सेना’ या सीरिजमध्ये हृता दुर्गुळेसोबत अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर देखील या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळत आहे. ८ जुलैला ही वेब सीरिज Disney + Hotstar वर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजच्या माध्यमातून हृताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. सध्या तिच्या सीरिजला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. Hrutha Durgule |
हेही वाचा :





