हृतिक-ज्युनिअर एनटीआरच्या ‘वॉर २’चा जलवा, रिलीजपूर्वीच केली मोठी कमाई

War 2 Film | बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरची जोडी ‘वॉर २‘ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. २७ जुलै पासून यूएसमध्ये ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे.
रिपोर्ट्स नुसार, युएसमध्ये पहिल्याच दिवशी २७२ तिकीट विकली गेली आहेत. यामध्ये तेलगू डेबूने हिंदी व्हर्जनला मागे टाकले आहे. तेलगू डेबूचे १५८ तर हिंदीचे ११४ तिकीट विकली गेली आहेत. हिंदी व्हर्जनने जवळपास १.८१ लाखांची तर तेलगू व्हर्जनने ३.५७ लाखांची कमाई केली आहे. भारतात अद्याप ‘वॉर २’ ची ऍडव्हान्स बुकिंग सुरु झालेले नाही.
‘वॉर २’हा २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. हृतिक रोशन ‘कबीर’ या भूमिकेत दिसणार असून, ज्युनिअर एनटीआरचा हा बॉलीवूडमधील डेब्यू आहे. कियारा अडवाणी सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे. यात कियारा अॅक्शन सीनमध्ये दिसणार आहे. War 2 Film |
‘वॉर २’ हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते हृतिक आणि एनटीआरचं दमदार अॅक्शन रूप पाहण्यासाठी उत्सुकता आहे. दरम्यान, हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचा ‘वॉर २’ १४ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. War 2 Film |
हेही वाचा :





