Hrithik Roshan Get Injured: हृतिक रोशनला दुखापत; व्हिडिओ व्हायरल
Hrithik Roshan Get Injured: अभिनेता हृतिक रोशनच्या पायाला दुखापत झाली आहे, सध्या सोशल मिडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Hrithik Roshan Get Injured: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो एका वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालत असल्याचे दिसत आहे. यावरून चाहत्यांनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी ‘तू लवकर बरा हो’ असे लिहिले आहे, तर अनेकांनी ‘लवकरच बरे व्हाल, काळजी करू नका’, ‘गेट वेल सून’, असे कमेंट करत लिहिले आहे.
View this post on Instagram
गेल्या वर्षीही हृतिक रोशनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ‘वॉर २’मधील गाण्याचे शूटिंग करताना त्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला आराम करण्यास सांगितले असल्याच्या माहिती त्याच्या प्रतिनिधींनी दिली होती. Hrithik Roshan Get Injured:
हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो ‘क्रिश ४’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या आधीच्या भागाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. यानंतर तर त्याच्या आगामी चित्रपटाकडूनही चाहत्यांना आणखी अपेक्षा आहेत. Hrithik Roshan Get Injured:
हेही वाचा:
Amit Shah : अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण





