महाराष्ट्र हादरला…! गुंगीचं औषध पाजून तीन मुलींवर अत्याचार; भोंदूबाबाचं नग्नपूजा अन् विकृत खेळ, मध्यरात्री काय घडलं?

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर अल्ला आहे. नग्नपूजा केल्यास पैशाचा पाऊस पाडून दाखवतो, असं आमिष दाखवत एका भोंदूबाबाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन अल्पवयीन मुलींना गुंगीचे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
याप्रकरणी भोंदूबाबा अब्दुल कदीर ऊर्फ कदिलबाबा, त्याचा सहकारी आशिष, त्याची मैत्रीण आणि त्यांचे परिचित इतर दोघे अशा पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल कदीर ऊर्फ कदिलबाबा असं या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने आपला मित्र आशिष आणि त्याची एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मैत्रीण यांच्या मदतीने ही नग्नपूजा आणि हा सर्व विकृत खेळ रविवारी मध्यरात्री मांडला होता.
यासाठी त्यांनी तीन गरीब अल्पवयीन तरुणींना पैशाचे आमिष दाखवत यात सहभागी करून घेतले. तुम्ही केवळ कपडे काढून दाखवा, मी पैशाचा पाऊस पाडतो. आपण सर्व श्रीमंत होऊ अशाप्रकारची बतावणी त्याने केली. मात्र, पूर्वनियोजित प्रकारातून या मुलींना पूजेच्या निमित्ताने कसले तरी गुंगीचे औषध देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हा धक्कादायक प्रकार सकाळी मुलींनी आपल्या एका मित्राला सांगितली. मित्राने थेट पोलिस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार पोलिसाना सांगितला. त्यावरून भोंदूबाबा आणि त्याचा सहकारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना २५ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





