“भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे रेकॉर्ड मोडणारे कायद्याचे राज्य कसे आणणार?” ; पंतप्रधान मोदींची राजदवर सडकून टीका

PM Modi in Bihar। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर हल्लाबोल केला आहे. बिहार मधील एका सभेला संबोधित करताना मोदींनी,”कंदीलाच्या काळातील लोक बिहारला वीज देऊ शकणार नाहीत” असे म्हणत राजदवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींनी लालू यादव यांच्या राजवटीचे वर्णन जंगलराज म्हणून केले. त्यासोबतच ते म्हणाले की, “बिहारमध्ये ४०,००० रुपयांसाठी अपहरणाच्या घटना एकेकाळी सामान्य होत्या” म्हणत बिहारमधील गुंडगिरीला राजद जबाबदार असल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सभेला संबोधित करताना, “एनडीए आणि भाजपचे सर्वोच्च प्राधान्य बिहारचा अभिमान आणखी वाढवणे, बिहारची गोड भाषा आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे आणि बिहारचा विकास करणे आहे. जेव्हा भारत समृद्ध, आर्थिकदृष्ट्या आणि ज्ञान आणि विज्ञानात एक प्रमुख शक्ती होता, तेव्हा बिहारने त्यात मोठी भूमिका बजावली. म्हणूनच, आज विकसित भारत निर्माण करण्यासाठी बिहारचा विकास महत्त्वाचा आहे.”असे म्हटले.
पंतप्रधान मोदींनी राजदवर टीका केली PM Modi in Bihar।
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहारला पुढे नेण्यासाठी आपल्याला उद्योग आणि उद्योगाची आवश्यकता आहे. उद्योगांना जमीन, वीज, कनेक्टिव्हिटी आणि कायद्याचे राज्य आवश्यक आहे. असे म्हणत कल्पना करा, जमीन हडपण्याचा इतिहास असलेले लोक कोणत्याही उद्योगासाठी जमीन देतील का?” “बिहारला कंदील युगात ठेवणारे वीज देऊ शकतील का? रेल्वे लुटणारे बिहारमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारू शकतील का? भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे रेकॉर्ड मोडणारे कायद्याचे राज्य आणू शकतील का?” असे सवाल करत राजदवर सडकून टीका केली.
#WATCH | Muzaffarpur, Bihar: Prime Minister Narendra Modi says, “… During the rule of the Congress-RJD alliance, even honors and awards were given only to those who bowed before their political masters. Can such people ever uplift the poor? Even in the name of social justice,… pic.twitter.com/yDalvteNpA
— ANI (@ANI) October 30, 2025
२००१ च्या अपहरण प्रकरणाची करून दिली आठवण PM Modi in Bihar।
पुढे ते म्हणाले, “जंगलराजचे दिवस आठवल्याने परिस्थिती किती धोकादायक होती याची कल्पना येते. मुझफ्फरपूरचे लोक तुम्ही आरजेडी सरकारच्या काळात घडलेला गोलू अपहरण प्रकरण कधीही विसरू शकत नाही. याच शहरात २००१ मध्ये, शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलाला गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या अपहरण केले होते ज्यांनी त्या बदल्यात भरपूर पैसे मागितले होते. जेव्हा ते पैसे देऊ शकत नव्हते, तेव्हा या आरजेडीच्या गुंडांनी त्या लहान मुलाला ठार मारले.”
पंतप्रधान मोदी यांनी, “जिथे बंदुका आणि क्रूरतेचे राज्य असते, तिथे कायदा अपयशी ठरतो. जिथे कटुता वाढवणारे आरजेडी आणि काँग्रेस असतात, तिथे सामाजिक सलोखा कठीण असतो.”असे त्यांनी सांगितले. तसेच “जिथे आरजेडी आणि काँग्रेसचे गैरशासन असते, तिथे विकास होत नाही. जिथे भ्रष्टाचार असतो, तिथे सामाजिक न्याय नसतो. गरिबांचे हक्क हिरावले जातात आणि काही कुटुंबेच समृद्ध होतात. असे लोक बिहारचे कधीही भले करू शकत नाहीत.” असे म्हणत काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्लाबोल केला.





