गुगल मॅपचे स्ट्रीट व्यू फिचर जवळपासच्या परिसराचा पत्ता जाणून घेण्यासाठी तसेच दुकाने, मार्ग आणि ठिकाणे शोधण्यात खूप मदत करते. स्ट्रीट व्यू फिचर भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसले तरी, तुम्ही ते पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह 360-डिग्री व्यूमध्ये तुमचे परिसर किंवा कोणतेही ठिकाण शोधण्यासाठी वापरू शकता. स्ट्रीट व्यूमध्ये तुम्ही तुमचे घर तसेच जवळपासची दुकाने, इमारती आणि पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कार देखील पाहू शकता. म्हणजेच, आपण सर्वकाही वास्तविक जीवनात जसे आहे तसे पाहू शकता. पण यामुळे कोणाच्या तरी घराची किंवा व्यक्तीची हेरगिरी करण्याचा धोकाही निर्माण होतो. असे होऊ नये म्हणून गुगलने काही नियम आणि कायदे केले आहेत.
* गुगलचे गोपनीयता धोरण काय आहे?
गुगलचे ऑफिशियल सपोर्ट पेज असे सांगते की “चेहरे आणि परवाना प्लेट्स सारख्या अस्पष्ट ओळख माहितीसाठी स्ट्रीट लेव्हल कलेक्शन आणि फोटो पाथ ऍटोमॅटिकली ब्लर किंवा अस्पष्ट केले जातात. याव्यतिरिक्त, आपण 360 व्यू फोटो अपलोड करत असाल तर इतरांच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी फोटोतील कोणत्या घटकाला व्हिजिबल करायचे आणि कोणत्या घटकाला ब्लर करायचे, हे निवडण्याचा पर्याय आहे.
गुगल मॅप्सवर तुम्ही काही ब्लर केलेले असेल किंवा ते गुगल मॅप्स सारखे सार्वजनिक पोर्टलवर नसावे असे वाटत असेल तर गुगल तुम्हाला ते व्हेरिफाय करण्याचा आणि ब्लर करण्याचा पर्याय देते. जर फोटो तुम्ही अपलोड केला असेल किंवा फोटो अपलोड करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखता, तर तुम्ही त्यांना तुमच्यासाठी तो भाग ब्लर करण्यास सांगू शकता. जे तुम्हाला खाजगी ठेवायचे असेल ते तुमचे घर, बिल्डिंग नंबर, पत्ता, कार नंबर प्लेट, इत्यादी काहीही असू शकते.
* ‘ही’ महत्वाची गोष्ट देखील जाणून घ्या
तुमच्याकडे असे काही आहे आणि ते तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर, तुम्ही ते ब्लर करण्यासाठी गुगलला विनंती करू शकता. पण, त्याआधी तुम्हाला त्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. एकदा ब्लर केलेला फोटो नंतर ब्लर करता येत नाही. गुगल यानंतर फोटो पाथला सपोर्ट करत नाही. नवीन फोटो पाथ गुगल मॅपवर पब्लिश केले जाऊ शकत नाहीत. गुगलकडे फोटो नसल्यास, फोटो अपलोड करणाऱ्या व्यक्तीने फोटो अपलोड करण्यापूर्वी तो ब्लर करणे आवश्यक आहे. तथापि, तुम्ही गुगलला नंतर फोटो ब्लर करण्याची विनंती करू शकता.
* फोटो ब्लर करण्याची विनंती करण्यासाठी ‘हे’ करा
. क्रोम किंवा इतर कोणताही ब्राउझर वापरा आणि maps.google.com वेबसाइट उघडा.
आता त्यावर लॉगिन करा आणि आता, तुम्हाला ज्या ठिकाणी गुगल ब्लर जोडायचा आहे तेथे जा. (उदा. घर, कार नंबर प्लेट, पत्ता इ.)
. स्थानाच्या नावाच्या टॅगवरील आय बटणावर क्लिक करा आणि “रिपोर्ट अ प्रॉब्लेम” निवडा.
. पुढील पृष्ठावर इमारत, नंबर प्लेट किंवा तुम्हाला जे काही कळवायचे आहे ते निवडा आणि कारण द्या.
. कॅप्चा आणि ईमेल पत्ता भरा आणि शेवटी रिक्वेस्ट सबमिट करा. गुगल लवकरच फोटो ब्लर करेल