IPL 2025 (Unsold Players) : आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 182 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये 62 परदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले असून 8 खेळाडूंवर राईट टू मॅच कार्डचा वापर करण्यात आला आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर सारख्या खेळाडूंना आयपीएल मेगा लिलाव 2025 मध्ये मोठी रक्कम मिळाली. दुसरीकडे, 395 खेळाडू अनसोल्ड राहिले. यामध्ये पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश असलेल्या मोठ्या खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. पण हे खेळाडू अनसोल्ड राहिल्यानंतरही आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात का? जर होय, तर ते मग कसे? जाणून घेऊया…. नियम काय आहेत? लिलावात न विकलेले (UNSOLD) खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला(Sold Player) दुखापत झाल्यास, फ्रँचायझी त्या खेळाडूच्या जागी पूलमध्ये न विकलेल्या खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा समावेश करू शकते. याला इंजरी रिप्लेसमेंट म्हणतात. इंजरी रिप्लेसमेंटचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बदली खेळाडूची मूळ किंमत दुखापतग्रस्त खेळाडूच्या मूळ किमतीपेक्षा जास्त नसावी. उदाहरणार्थ, पृथ्वी शॉ ची मूळ किंमत 75 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूची किंमत 75 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हाच पृथ्वीची निवड होऊ शकते. हे 3 स्टार खेळाडू राहिले अनसोल्ड…. 1. पृथ्वी शॉ : या भारतीय खेळाडूला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तर त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. पृथ्वी शॉने 2018 ते 2024 पर्यंत 79 IPL सामने खेळले आहेत. या 79 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 147.5 च्या स्ट्राइक रेटने 1892 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2025 : अजिंक्य रहाणे होणार KKRचा पुढचा कर्णधार? आयपीएल 2025 च्या आधी मोठी अपडेट आली समोर… 2. डेव्हिड वॉर्नर : या आॅस्ट्रेलियन खेळाडूला आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. तर त्याची मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये होती. डेव्हिड वॉर्नरने 2009 ते 2024 पर्यंत 184 आयपीएल सामने खेळले आहेत. या 184 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 139.8 च्या स्ट्राइक रेटने 6565 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 शतके आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. 3. शार्दुल ठाकूर : या भारतीय अष्टपैलू खेळाडूला आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघाने विकत घेण्यास रस दाखवला नाही. त्याची मूळ किंमत फक्त 2 कोटी रुपये इतकी होती. शार्दुल ठाकूरने 2015 ते 2024 पर्यंत 95 आयपीएल सामने खेळले आहेत. या 95 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 9.22 च्या इकॉनॉमीने 94 विकेट घेतल्या आहेत.