IPL 2025 : अजिंक्य रहाणे होणार KKRचा पुढचा कर्णधार? आयपीएल 2025 च्या आधी मोठी अपडेट आली समोर…

IPL 2025 (Ajinkya Rahane, KKR ) : आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांच्या कर्णधारपदात मोठे बदल होणार आहेत, ज्यासाठी चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पुढील हंगामात अजिंक्य रहाणेला कर्णधार बनविण्याच्या विचारात असल्याचे एका रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की; “केकेआरने रहाणेला कर्णधारपदासाठीच खरेदी केले आहे.” जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात कोलकाताने रहाणेला 1.5 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.
🚨 CAPTAIN AJINKYA RAHANE 🚨
Rahane emerged as the strong contender to lead KKR in IPL 2025. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/BSxQ3q1QHv
— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2024
रिपोर्टमध्ये एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, “होय, या क्षणी हे 90 टक्के निश्चित आहे की अजिंक्य रहाणे केकेआरचा कर्णधार असेल. त्याला विशेषतः कर्णधारपदाचा एक व्यवहार्य पर्याय असण्याच्या उद्देशाने विकत घेण्यात आले होते.”
तथापि, याआधी अशाही बातम्या समोर आल्या होत्या ज्यात असे म्हटले होते की, केकेआर पुढील हंगामासाठी अष्टपैलू व्यंकटेश अय्यरकडे संघाची कमान सोपवू शकते. वेंकटेशला फ्रँचायझीने मेगा लिलावात 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तथापि, रहाणे किंवा व्यंकटेश अय्यर यांच्यापैकी एकाचा कर्णधार होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मुंबईने रहाणेला कर्णधारपदावरून हटवले…
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाची कमान सोपवण्यात आली नव्हती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यरला मुंबईचा कर्णधार बनवले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अय्यर यांच्या नेतृत्वाखाली कोलकाताने गेल्या वर्षी (IPL 2024) आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता KKR अशा खेळाडूला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे ज्याला मुंबईने T20 टूर्नामेंटसाठी कर्णधार बनवले नाही.
IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया ॲडलेडला रवाना, गुलाबी चेंडूने खेळला जाईल दिवस-रात्र सामना…
रहाणे मागील दोन हंगामात (2023 आणि 2024) चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आता केकेआरने त्याच्यावर दाव लावला आहे. आता याचा केकेआरला किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





