Rinku Rajguru : बेटर अॅाफ कसा हवा? रिंकू राजगुरुने दिलं भन्नाट उत्तर म्हणाली…

Rinku Rajguru : सैराटफेम अभिनेत्री रिंकू राजगुरु तिच्या बेटर हॅापची लव्हस्टोरी या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रिंकने अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. या सिनेमाला घेऊन ती मुलाखत देत आहे. आता अशाच एका मुलाखतीत रिंकूला तिचा बेटर अॅाफ कसा हवा? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने भन्नाट उत्तर दिलं आहे. त्याची जोरदार चर्चा होत आहे.
सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव महाराष्ट्राला परिचयाचं झालं आहे. तिने अनेक सिनेमे आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनोरंजन केलं आहे. रिंकू राजगुरुचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर रिंकू नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी पोस्ट शेअर करत असते. तिच्या पोस्टला चाहते देखील कमेंट्स करतात.
बघितल्याच क्षणी वाटलं पाहिजे की हाच तो!
सैराटमधील आर्ची आणि परशा हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. मात्र, रिंकूने कायमच या चर्चांना नकार दिला आहे. एका मुलाखतीत रिंकूला तिचा बेटर हाफ कसा असावा? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने असा मी काही विचार केला नाही. बघितल्याच क्षणी वाटलं पाहिजे की हाच तो! सगळ्या मुलींना जे हवं असतं तेच की तो आदर देणारा आणि काळजी घेणारा असावा. गृहित धरणारा नसावा, असं उत्तर तिने दिलं.
पुढे ती म्हणाली बायको म्हणणारा असेल तर ये..गर्लफ्रेंड म्हणणारा असेल तर आपल्याला नको. आजकाल जे चालू आहे ते पाहून तर असंच वाटतं, असंही तिने स्पष्ट केलं.





