Anjali Anand : ‘जाड मुलींना काम कसं मिळतं?’ अभिनेत्रीची उडवली जायची खिल्ली; अंजली आनंदने कामातून दिलं उत्तर
Anjali Anand : लोक सोशल मीडियावर मेसेज करून जाडपणावरून हिणवतात आणि इतके वजन असून काम कसे मिळत आहे, असे अश्लील प्रश्न विचारतात.

Anjali Anand : अभिनेत्री अंजली आनंद तिच्या दमदार अभिनयामुळे सतत चर्चेत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर तिने ‘डब्बा कार्टेल’ आणि ‘रात जवान है’ या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती ‘धमाल ४’मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासोबत झळकणार आहे.
‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोड याचं ‘धमाल ४’ मध्ये हिंदी व्हर्जनमध्ये साडी हे गाण रिलीज झालं आहे. हे गाण सध्या खूप ट्रेंड होत आहे. या गाण्यात झळकलेली अंजली आनंदचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही अंजलीच्या जाडपणावरून तिची खिल्ली उडवली जायची. याविषयी अभिनेत्रीने एका पॅाडकास्ट मुलाखतीत खुलासा केला आहे.
लोक सोशल मीडियावर मेसेज करून जाडपणावरून हिणवतात आणि इतके वजन असून काम कसे मिळत आहे, असे अश्लील प्रश्न विचारतात. देबिना बॅनर्जी यांच्याशी बोलताना अंजलीने ही वेदना व्यक्त केली, “लोकांकडून मला पहिला मेसेज येतो तो म्हणजे, ‘जे लोक तुला काम देत आहेत, त्यांच्यासाठी तू काय करत आहेस? ते मुळात असे म्हणतात की, बारीक लोक घरी बसून आहेत, तर जाड मुलींना काम मिळत आहे.” मग तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहात?”
View this post on Instagram
यावर अंजली म्हणाली “कोणीही याकडे पाहू नये. काम हे प्रतिभेवर आधारित असते, आकारावर नाही. मला नेहमीच माहित होते की मी एक नायिका आहे. मी स्वतःला तसेच पाहते. कोणी काय विचार करतो याची मला पर्वा नाही.” असे सडेतोड उत्तर अभिनेत्रीने दिले.
पुढं ती म्हणाली “लोक इतका चुकीचा विचार कसा करू शकतात, हेच मला समजत नाही. एखाद्या व्यक्तीच्या प्रतिभेकडे पाहण्याऐवजी तिच्या शरीराच्या आकारावरून मत बनवणं चुकीचं आहे. काम हे नेहमी गुणवत्तेच्या जोरावर मिळतं, शरीरयष्टीवर नाही.” अंजलीने आत्मविश्वासाने सांगितले की, “मी स्वतःला नेहमीच नायिका मानते. लोक काय बोलतात, याची मला अजिबात पर्वा नाही.”
धमाल ४ ‘या’ दिवशी होणार रिलीज
तिने पुढे चाहत्यांना संदेश देत म्हटले, “स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आयुष्याचे नायक-नायिका स्वतःच बना. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःवरचा विश्वास अधिक महत्त्वाचा आहे.”
धमाल ४ हा लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीतील आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि अंजली आनंद महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. ‘धमाल’ मालिकेतील आधीचे तीनही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, चौथ्या भागातही विनोद, गोंधळ आणि मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis: “…तेव्हा प्रेमभंग झाला, आता प्रेम जुळणं कठीण”; देवेंद्र फडणविसांचा उद्धव ठाकरेंना टोला




