Houthis attack : हौथींकडून सौदीच्या दोन विमानतळांवर हल्ले; तीन जण गंभीर जखमी
हमासने इस्रायलवर ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या (बुधवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे हा संपूर्ण सप्ताह इस्रायलमध्ये शोक पाळला जाणार आहे.

Houthis attack – येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदी अरेबियामधील दोन विमानतळांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये तिघेजण जखमी झाल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. हौथी बंजखोरांनी सौदी अरेबियामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे म्हटले होते. त्यानंतर सौदीने हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सौदीतील नाजरान आणि जिझान शहरातल्या विमानतळांवर सोमवारी मारा झाला. यामुळे या विमानतळांच्या इमारतींचे नुकसान झाल्याचे सौदी अरेबियाच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे. या विमानतळांवरील हल्ले कोणी केले, हे प्राधिकरणाच्या निवेदनात नमूद करण्यात आलेले नाही. पण हे हल्ले हौथींनीच केले असल्याचे मानले जाते आहे.
हौथींनी ताबा मिळवलेला भूभाग परत मिळवण्यासाठी सौदीच्या नेतृत्वाखालील येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त आघाडीने पायदळाची कारवाई सुरू केली आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडील टोकाच्या किनाऱ्याजवळच्या काही बेटांवर हौथींनी ताबा मिळवला आहे. यामुळे या सागरी मार्गाने होणारी तेलाची निर्यात प्रभावित झाली आहे. सौदीच्या पायदळाला हौथींच्या सैन्याला किनाऱ्यापासून मागे हटवण्यात अंशतः यश आले आहे.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एक ठार
इस्रायलने गाझा सिटीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला आणि काही जण जखमी झाल्याचे शिफा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या उद्यानाजवळ दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हा भाग गाझा पट्ट्यातला अत्यंत दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. मात्र यासंदर्भात अन्य कोणताही तपशील इस्रायलने दिला नाही.
हमासच्या हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण
हमासने इस्रायलवर ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या (बुधवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे हा संपूर्ण सप्ताह इस्रायलमध्ये शोक पाळला जाणार आहे. ज्यू दिनदर्शिकेनुसार हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त, देशाने सोमवारी स्मृती कार्यक्रमांना सुरुवात केली असून, बुधवारी आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार वर्षपूर्तीनिमित्त आणखी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
हमासच्या हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुमारे १,२०० लोकांना ठार केले आणि २५१ जणांना ओलीस ठेवले, यामुळे युद्धाला तोंड फुटले. इस्रायलने गाझा पट्ट्यात हमासविरुद्ध सुरू केलेले युद्ध नंतर संपूर्ण प्रदेशात पसरले.





