‘हाऊसफुल 5’मध्ये आणखी एका दिग्गज अभिनेत्याची होणार एन्ट्री

Housefull 5 | ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहे. यानंतर ‘हाऊसफुल 5’ची घोषणा केल्यापासून चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या चारही भागांमध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्यभूमिकेत पाहायला मिळाला. यानंतर आता तो पाचव्या भागात देखील पाहायला मिळणार आहे. मात्र त्याच्यासोबत इतरही अनेक कलाकार मंडळी दिसणार आहे. यातच आता या चित्रपटात आणखी एका दिग्गज कलाकराची एंट्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमार आणि रितेश देशमुख सारखे कलाकार हाऊसफुल 5 मध्ये काही नवीन ट्विस्ट घेऊन परत येत आहेत. संजय दत्त, फरदीन खान, नोरा फतेही, रितेश देशमुख, अनिल कपूर आणि पूजा हेगडे यांसारखे नवीन सदस्यही यात आहेत. यानंतर आता जॅकी श्रॉफ देखील हाऊसफुल 5 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त दोघेही विनोदी मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्याची पात्रं कथेत विनोदाची भर घालतील. परंतु याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणांमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ‘हाऊसफुल ५’ चित्रपट ६ जून २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका घातला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर 2012 मध्ये ‘हाऊसफुल्ल 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 2016 मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’ आणि 2019 मध्ये ‘हाऊसफुल्ल 4’ हे सिनेमाही प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ‘हाऊसफुल्ल 5’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज होणार आहे.
हेही वाचा:
आलिया भट्टला चित्रपट सुपरहिट करण्यासाठी हिरोची गरज नाही ?






