Housefull 5 : गूढ हत्या अन् कॅामेडीचा अनोखा मिलाफ; हाऊसफुल्ल 5 चा जॅानर एकदम हटके, एकदा बघाच!

हाऊसफुल्ल सिरीजचा पुढचा म्हणजेच हाऊसफुल्ल 5 चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाचे मेकर्स चित्रपटाविषयी नेहमी अपडेट देत असतात. या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटातील स्क्रीप्ट या आधी प्रदर्शित झालेल्या भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. तसेच चित्रपटाच बजेटही मोठं असणार आहे. बॅालीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या करिअरमधील सर्वात महागडा चित्रपट हाऊसफुल्ल 5 असणार आहे. या चित्रपटात गूढ हत्या अन् कॅामेडीचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे.
‘हाऊसफुल 5’ ची कथा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. पण हा गंभीर चित्रपट असणार नाही. तर गंभीरता मजेदार पद्धतीने दाखवली जाणार आहे. ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची कथा मुळात ही एक मर्डर मिस्ट्री आहे. जहाज क्रूझवर एक खून झाला आहे. चित्रपटातील सर्व कलाकार या हत्येतील संशयित आहेत. या कलाकारांमध्ये दोन स्टार्स हे पोलीस बनले आहेत. या गूढ खूनाची उकलण्याचा प्रयत्न कोण करणार? ते मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहचणार? याची कथा अत्यंत मजेशीर पद्धतीने दाखवण्यात येणार आहे.
नुकतेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये दोघेही पोलिसांच्या वेशभूषेत दिसले होते. या फोटोत संजय दत्त आणि जॅकी पोलिसांची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता साजिद नाडियादवाला आपल्या मर्डर-मिस्ट्रीला कॉमेडी जॉनरमध्ये कसे दाखवणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
तरुण मनसुखानी हे हाऊसफुल्ल 5 चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, दिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रणजीत, सौंदर्या शर्मा हे कलाकार दिसणार आहेत.




