‘हाऊसफुल 5’चा धमाकेदार टीझर रिलीज; नाना पाटेकरांचा वेगळा अंदाज समोर

Housefull 5 Teaser Release | बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हाऊसफुल 5’चा धमाकेदार टीझर अखेर रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चित्रपटातील टीझरमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांचे वेगवेगळे हावभाव दिसत आहेत. तसेच, नाना पाटेकरांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुखने या टीझरला हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, “आजपासून १५ वर्षांपूर्वी, वेडेपणाची सुरुवात झाली. भारताची सर्वात मोठी फ्रँचायझी 5व्या भागासोबत परत आली आहे आणि यावेळी ती केवळ गोंधळ आणि विनोदी नाही… तर एक किलर कॉमेडी!” टीझरमध्ये पुढे एक खून होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोणाचा खून होणार, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
View this post on Instagram
‘हाऊसफुल 5’ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. ‘हाऊसफुल 5’ चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फाखरी, फरदीन खान, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे.
‘हाऊसफुल’ पहिल्या चार भागांना देखील चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आता पाचवा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Housefull 5 Teaser Release |
दरम्यान, अक्षय कुमार नुकताच ‘केसरी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, रितेश देशमुख लवकरच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो अजय देवगणसह प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. Housefull 5 Teaser Release |
हेही वाचा:
भारत अमेरिकेच्या ‘टॅरिफ टेन्शन’पासून होणार free? ; ट्रम्प यांनी दिले दिलासा देणारे संकेत





