हॉट ‘मलायका अरोरा’चा उलट-सुलट योगा पाहून नेटकरी झाले फिदा; कमेंट करत म्हणाले….

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.
अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. मलायकाची स्कीन देखील कायमच ग्लो करते. अनेकांना मलायका अरोरा हिच्यासारखे फीट राहण्याची इच्छा आहे. कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही अनेकांची समस्या बनली आहे.
अश्यातच, अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यामध्ये मलायका योगा करताना दिसत आहे. मलायकाने अतिशय अवघड योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे आसन पोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंना प्रशिक्षित करण्यासाठी केले जाते.
व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले… “हॅलो! चला आज आणखी एका सुंदर दिवसाचे योगाने स्वागत करूया. आज मी ज्या आसनाचा सराव करत आहे ते एक शक्तिशाली योग आसन आहे’. या आसनाचे फायदे सांगताना मलायकाने लिहिले, ‘याला चक्की चालनासन म्हणतात.
या आसनामुळे पोटाचे स्नायू प्रशिक्षित होऊन त्यांना ताकद मिळते. त्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते, तणाव कमी होतो आणि मनाला शांती मिळते. त्यामुळे तुम्हीही हे आसन करून पहा आणि त्याचा आनंद घ्या’. अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.





