हॉट अँड बोल्ड अभिनेत्री ‘निया शर्मा’ची सायकलवर कसरत; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई – सायकलिंग करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सकाळी सायकलिंग करून कॅलरी बर्न करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज सायकलिंगवर भर देतात. अलीकडेच मिलिंद सोमणनेही 1000 किलोमीटर सायकलिंग करण्याच्या कामगिरीचा एक फोटो शेअर केला होता.
View this post on Instagram
आता निया शर्मानेही आपल्या सायकलिंगच्या व्यायामाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पिंक कॅप, पिंक जॅकेट आणि ब्लॅक शॉर्ट घातलेली निया शर्मा गिअरच्या सायकलवरून एका निवांत रस्त्यावरून चालली आहे.
View this post on Instagram
सायकल चालवत असतानाचा तिचा एक व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. दोन्ही हात सोडून ती निवांत चालली आहे. तिने कसरत करताना हळूच जीभ चावली आणि आपल्याच कौशल्यावर ती खूश झाली.
View this post on Instagram
निया शर्मा सध्या “एक हजारोंमे मेरी बहना है’ या मालिकेतून झळकली आहे. याशिवाय अलीकडेच ती “बिग बॉस’मधून देखील “ओटीटी’वर दिसली होती. “बिग बॉस’च्या घरातही निया शर्माने खूप दंगामस्ती केली होती.





