Jitendra Shelke : भोंदुबाबा अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. Jitendra Shelke
प्राथमिक माहितीनुसार, शेळके यांच्या कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा गंभीर अपघात झाला. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Jitendra Shelke : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच शिवनिका ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या उपाध्यक्षांचा झालेला अपघाती मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करत आहे. हा अपघात की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. Jitendra Shelke
जितेंद्र शेळके यांची कार उभ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. अशोक खरात प्रकरणात शिवनिका ट्रस्टचे नाव वारंवार समोर येत आहे. याप्रकरणी तपास सुरु असून अनेक खुलासे होणे बाकी आहे. अशातच ट्रस्टच्या उपाध्यक्षतांचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. Jitendra Shelke
जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) हे अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जात होते. ट्रस्टमधील त्यांच्या जबाबदाऱ्यांबरोबरच खरात यांच्या व्यवसायातही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तसेच, खरात यांना अटक झाल्यानंतर शेळके मानसिक तणावाखाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.