nagar | मराठा एकीकरण समितीच्या वतीने पोलिसांचा सन्मान

राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, शिंदे,उपनिरीक्षक पोपट कटारे, चारुदत्त खोंडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा मराठा एकीकरण समितीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला.
दुचाकी व विद्युत मोटार चोरणारी टोळी, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेतल्याबद्दल पोलिसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचारी अशोक शिंदे, सूरज गायकवाड, विकास साळवे, सचिन ताजने, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, आदिनाथ पाखरे, गणेश निपणे, रवींद्र कांबळे, दादासाहेब रोखले यांचाही सन्मान करण्यात आला.
राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून सोळा मुली बेपत्ता असल्याची नोंद दाखल झालेली होती. त्यापैकी तेरा मुलींचा शोध पो. नि.संजय ठेंगे यांनी लावला. तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारी चोरी जाण्याचे सत्र मागील काही वर्षात चालू होते. परंतु राहुरी पोलिस ठाण्यातील नव्याने दाखल झालेल्या सर्व पोलीस बांधवांनी पाण्याच्या मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा व दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त केला.
पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन अवघा दीड महिना झालेला आहे .कमी कालावधीत मागील २२ गुन्ह्यांचा तपास लावत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यामुळे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या तपास कामाचा सन्मान करत सत्कार केला. याप्रसंगी सुरेश बानकर,सतीश घुले,राजेंद्र लबडे,संदीप गाडे,अशोक तनपुरे,कैलास तनपुरे,मेजर नामदेव वांडेकर,सुनील निमसे,धनंजय देशमुख,सतीश चोथे,विलास तनपुरे,वैभव तनपुरे,रवींद्र कदम,सागर ताकटे ,रोहित नालकर ,देवेंद्र जाधव ,अविनाश शिरसागर,अनिल पेरणे आदी उपस्थित होते.





