पिंपरी | कावेरी जगताप महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने सन्मानित

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव येथील रहिवाशी कावेरी जगताप यांना शिफ्ट अॅण्ड लिफ्ट या कंपनीद्वारे महिलांसाठी रोजगार निर्माण करून देत महिला सबलीकरणात योगदान देत आहेत. महिला सबलीकरणाबरोबरच जनजागृतीसाठी योगदान देणार्या कावेरी जगताप यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिंचवड येथे शिफ्ट अॅण्ड लिफ्ट कंपनीने आयोजित महाराष्ट्र सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश सभे व सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
कावेरी जगताप यांना महिला सबलीकरण या विषयावर मानांकन मिळाले होतेे. त्यामध्ये महिला बचत गट महिलांना घरगुती व्यवसाय महिलांसाठी घरगुती वस्तू बनविणे, प्रशिक्षण देणे कोविड काळात केलेले कार्य अशा विविध कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्विकारताना कावेरी जगताप यांनी कंपनीचे आभार मानले.





