Pune news : मगराज राठी यांचा बिझनेस आयकॉन पुरस्काराने गौरव

Pune news | Magraj Rathi – महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ तसेच, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक मगराज राठी यांचा बिझनेस आयकॉन पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून व्यापारी दिन सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान समारंभात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे सचिन निवंगूने, नवनाथ सोमसे, दत्तात्रेय जाधव आदी उपस्थित होते.
राठी मागील अनेक वर्षांपासून बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. महेश नागरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरसामान्यांना पतपुरवठा करण्याचे काम त्यांनी केले आहे.
यावेळी राठी यांनी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे काम सर्वांना बळ देण्याचे असून ते खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. आगामी काळात आम्ही राजस्थानी समाज संघ आणि महेश नागरीच्या माध्यमातून काम करत असताना संघाचे असेच पाठबळ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.





