Video : विमानप्रवासात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वीराला मानाचा मुजरा; देशभक्तीचा सुंदर क्षण पाहाच…

Indigo | Operation Sindoor | BSF Officer : ऑपरेशन सिंदूरमध्ये धाडस आणि शौर्य दाखवणारे बीएसएफ अधिकारी ‘राजप्पा बीडी’ यांचा इंडिगो एअरलाइन्सने जाहीर सन्मान केला आहे. १० जून २०२५ रोजी दिल्लीहून बंगळुरूला निघालेल्या इंडिगो फ्लाइटच्या अटेंडंटने माइकवर राजप्पा बीडी यांच्या शौर्य, समर्पण आणि राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाला सलाम केला.
यादरम्यान, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवून बीएसएफ अधिकाऱ्याला त्यांच्या शौर्याची कहाणी ऐकून सलाम केला. यानंतर, बीएसएफने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करून इंडिगो एअरलाइन्सचे आभार मानले आहेत.
इंडिगोच्या फ्लाईट अटेंडंटने काय म्हटले?
इंडिगोच्या फ्लाईट अटेंडंटने म्हटले, ‘या फ्लाईटमधील एका अतिशय खास प्रवाशाला सन्मानित करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ७ आणि ८ मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या जोरदार गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या १६५ व्या बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक राजप्पा बीडी हे त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करताना गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या धाडसी आणि निस्वार्थ कार्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करूया.’ जेव्हा हे शब्द विमानात घुमले तेव्हा प्रत्येक प्रवाशाने टाळ्या वाजवल्या आणि अभिमानाने डोके वर काढले.
“कुछ वीर जन्म से नहीं, कर्म से महान बनते हैं”
दिनांक 10 जून 2025, इंडिगो दिल्ली-बेंगलुरु के विमान कर्मी दल द्वारा बीएसएफ की 165 बटालियन के सहायक उप निरीक्षक राजप्पा बी.डी. द्वारा ऑपरेशन सिन्दूर में किये गए वीरोचित कार्य का पुनः स्मरण, उनकी कर्तव्यनिष्ठा और देश के लिए समर्पण का… pic.twitter.com/CBASsQLpd7
— BSF (@BSF_India) June 11, 2025
बीएसएफने कृतज्ञता व्यक्त केली :
इंडिगो फ्लाइटबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, बीएसएफने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘काही वीर जन्माने महान नसतात, तर ते कर्माने महान असतात…’ दिनांक १० जून २०२५ रोजी, इंडिगो दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट क्रूने ऑपरेशन सिंदूरमध्ये बीएसएफच्या १६५ बटालियनचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजप्पा बीडी यांच्या वीर कृत्याचे स्मरण केले.
हे त्यांच्या देशाप्रती असलेल्या समर्पणाला आणि भक्तीला श्रद्धांजली आहे. सीमा सुरक्षा दल आपल्या शूर सीमा रक्षकाचा सन्मान करण्यासाठी या उपक्रमाबद्दल @IndiGo6E बद्दल कृतज्ञता व्यक्त करते, सीमा सुरक्षा दल राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित आहे’. असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल थोडक्यात…
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या खोऱ्यात फिरणाऱ्या पर्यटकांवर चार दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे संपूर्ण देश घाबरला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ला केला होता.





