Hong Kong Open 2024 : ट्रीसा-गायत्रीची आगेकूच तर चिराग-मानवचे आव्हान संपुष्टात…
Updated On:

Hong Kong Open 2024 Badminton : – भारताचे चिराग सेन व मानव चौधरी यांना हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. तर ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पात्रता फेरीतच चिराग आणि मानव यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. चिरागला कॅनडाच्या झियाओडोंग शेंगने १२-२१, २१-१३, २१-१४ असे पराभूत केले. मानव चौधरीला हॉंगकॉंगच्या चान यिन चकने २१-६, २१-१० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी युक्रेनच्या पोलिना बुहरोवा व येव्हेनिया कांटेमिर यांच्या जोडीला २१-१४, २१-१३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.


