Hong Kong Open 2024 : सुमित-सिक्की उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Hong Kong Open 2024 : कॉमनवेल्थ गेम्सच्या कांस्यपदक विजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला गुरुवारी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन महिला दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उप-उपांत्यपूर्व फेरी,Round of 16) चीनच्या लियू शेंग आणि तान निंग यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर पुरूषाच्या मिश्र दुहेरीतही भारताच्या हाती निराशा लागली.
दिवसाच्या आणखी एका सामन्यात बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी (B. Sumeeth Reddy and N. Sikki Reddy ) या मिश्र दुहेरीच्या जोडीला उप-उपांत्यपूर्व फेरीत (Round of 16) शेवन जेमी लाई आणि गोह सून हुआट या आठव्या मानांकित मलेशियाच्या जोडीकडून 11-21, 20-22 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
पहिल्या गेममध्ये 3-3 अशी चांगली सुरुवात केल्यानंतर शेवन जेमी लाइ आणि गोह सून हुआट यांनी 11-7 अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीने 14-11 स्कोअर पर्यंत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सलग सात गुण गमावल्यानंतर पहिला गेम गमावला. दुसरा गेम खूपच रोमांचक झाला आणि एकवेळ स्कोअर 11-10 असा होता. यानंतर सुमित रेड्डी-सिक्की रेड्डी यांनीही 16-13 अशी आघाडी घेतली. पण त्यांना ही लय कायम ठेवता आली नाही आणि दुसरा गेम 20-22 ने गमावला लागला.
Hong Kong Open 2024 : ‘जॉली-गायत्री’ जोडी प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभूत…
एकेरीतही निराशा….
दरम्यान, भारताची एकेरी मोहीम बुधवारी संपली. पुरुष एकेरीत प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. महिला एकेरीत आकर्षी कश्यप आणि तान्या हेमंत यांनाही पुढील फेरीत प्रवेश करता आला नाही आणि भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आलं.




