Paris Olympics 2024 (Badminton) : शानदार विजयासह सिंधू अन् लक्ष्यची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक..

Paris Olympics 2024 (Badminton) : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपापल्या सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवून एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत (Pre-QuarterFinal) प्रवेश केला आहे.
‘लक्ष्य’ची विजयी कामगिरी….
भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18, 21-12 असा पराभव करताना उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. लक्ष्यने पहिला सेट 28 आणि दुसरा सेट 23 मिनिटात जिंकून सर्वाना आश्चर्यचकित केले. लक्ष्याचा सामना उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये देशबांधव एच.एस. प्रणॉयशी होऊ शकतो जो शेवटच्या गट सामन्यात व्हिएतनामच्या ‘ले डक फाट’शी खेळेल.
𝐋𝐚𝐤𝐬𝐡𝐲𝐚 𝐁𝐚𝐫𝐤𝐚𝐫𝐚𝐚𝐫 𝐡𝐚𝐢!🥳
Sen triumphs at the #Paris2024Olympics as the star shuttler defeats his Indonesian opponent Jonatan Christie 21-18, 21-12 in the #Badminton Men’s Singles group match.
With this win, he qualifies for the Round of 16.
Let’s… pic.twitter.com/UaeB9DXfZ5
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
सिंधूची आगेकूच…
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाला पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
🏸 PV Sindhu defeats her Estonian opponent Kristin Kuuba 21-5, 21-10 in #Badminton women’s singles group match
With 2 out of 2 wins in the group stage, she qualifies for the pre- quarterfinals
Let’s #Cheer4Bharat, let’s cheer for Sindhu!
Catch all the live action on DD Sports… pic.twitter.com/ndYYZu4BmG
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
सिंधूने क्रिस्टिन कुबाला हिला 21-5,21-10 असे सहज पराभूत केले. सिंधू पुढील जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बिंगजियाओविरुद्ध खेळू शकते, जिच्याविरुद्ध ती 11 वेळा हरली आहे आणि नऊ वेळा जिंकली आहे.
एम गटातील पहिल्या सामन्यात सिंधूने मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा सहज पराभव केला होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पी. व्ही. सिंधूकडून पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्यानुसार सिंधूने आपला खेळ सातत्याने उंचावला आहे.





