2025 मध्ये घरी घेऊन जा Activa 125 चे नवेकोरे मॉडेल, ‘एवढ्या’ किंमतीत भारतीय बाजारात झाले लाँच

Honda Activa 125 2025 Edition Launched: वर्ष 2025 मध्ये गाडी खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात Activa 125 चे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने गाडीचे OBD2B व्हर्जन लाँच केले असून, यात नवीन कलर आणि आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. नवीन 2025 होंडा अॅक्टिव्हा 125 (Honda Activa 125 2025 Edition) ची एक्स शोरूम किंमत 94,222 रुपये आहे.
कंपनीने या दुचाकीमध्ये सिल्हूट कायम ठेवले आहे. तर सीट्सच्या रंगात थोडा बदल केला आहे. या दुचाकीला तुम्ही DLX आणि H-Smart या दोन व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. दुचाकी इग्नियस ब्लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, पर्ल सायरन ब्लू, रेबेल रेड मेटॅलिक आणि पर्ल प्रेशियस व्हाइट या 6 रंगात उपलब्ध आहे.
Honda Activa 125 2025 Edition – इंजिन
Honda Activa 125 2025 Edition मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहे. दुचाकी 123.92cc, सिंगल-सिलेंडर PGM-Fi इंजिनसह येते. हे इंजिन 6.20 kW पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करते. यात आधुनिक स्टॉप सिस्टम देखील देण्यात आली आहे.
फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीन 4.2 इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये होंडा रोडसिंक अॅपचा सपोर्ट मिळतो. याद्वारे नेव्हिगेशन, कॉल-मेसेज अलर्ट सारख्या फीचर्सचा उपयोग करता येईल. याशिवाय, USB टाइप-C चार्जिंग पोर्टची देखील सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे डिव्हाइस सहज चार्ज करणे शक्य आहे.
Honda Activa 125 2025 Edition – किंमत
नवीन Honda Activa 125 2025 Edition दोन व्हेरिएंटमध्ये येते. दुचाकीच्या DLX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 94,422 रुपये आणि H-Smart ची एक्स-शोरूम किंमत 97,146 रुपये आहे. संपूर्ण भारतात दुचाकीची विक्री सुरू झाली असून, नवीन वर्षात Honda Activa 125 2025 Edition ला घरी घेऊन येऊ शकता.





