हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि कार्तिक आर्यनची ग्रेटभेट

Johnny Depp and Kartik Aaryan | हॉलिवूडचा आयकॉनिक पायरेट जॉनी डेप आणि बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन एकाच फोटोत पाहायला मिळाले आहेत. सौदी अरब येथील जेद्दा शहरात सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये दोघांची भेट झाली. ज्याचे फोटो कार्तिकने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
कार्तिकने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघं एकत्र पोझ देताना दिसले. ‘पाइरेट्स ऑफ द रेड सी। जॅक स्पॅरो, रूहबाबा।’, असं कॅप्शनही त्यानं या फोटोला दिलं आहे. ‘भुलभुलैया ३’ सिनेमातील अभिनयासाठी कार्तिकला रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे एकीकडे पुरस्कार आणि हॉलिवूड स्टार जॉनी डेपसोबतची भेट कार्तिकसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरली आहे. Johnny Depp and Kartik Aaryan |
View this post on Instagram
जॉनी डेप हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’मधील कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेत तो दिसला होता. त्याच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
तर कार्तिक आर्यने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच कार्तिक ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ चित्रपटात दिसणार आहे. यात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केला आहे. Johnny Depp and Kartik Aaryan |
हेही वाचा:





