नवी दिल्ली – होळी हा सण आहे मौजमजेचा आणि बागडण्याचा. भारतात होळी साजरी केली जाते रंगांच्या माध्यमातून. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आज जगभरात धुलीवंदनाचा मोठा उत्साह दिसून आहे. होलिका दहन केल्यानंतर विविध रंगांनी धुलिवंदन सणाचा आनंद घेतला जातो.
दरम्यान, धूलिवंदन सणाच्या आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. “आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या या रंगांच्या सणानिमित्त आपल्या आयुष्यातही आनंदाचा प्रत्येक रंग येवो”. अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आप सभी को होली की हार्दिक शुभकामनाएं। आपसी प्रेम, स्नेह और भाईचारे का प्रतीक यह रंगोत्सव आप सभी के जीवन में खुशियों का हर रंग लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) March 18, 2022