HIL 2024 : हॉकी इंडिया लीगचे तब्बल सात वर्षांनंतर पुनरागमन, ‘या’ कालावधी दरम्यान होणार स्पर्धा….

नवी दिल्ली – बहुप्रतीक्षित हॉकी इंडिया लीग सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली असून ही लीग नव्या स्वरूपात घेण्यात येणार असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले. यामध्ये पुरुष व महिला असे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत पुरुष गटातून आठ तर महिला गटातून सहा संघ सहभागी होणार आहे. ही स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणार असून पुरुष गटाची स्पर्धा ओडिसातील राउरकेला येथे तर महिलांची स्पर्धा रांची, छत्तीसगड येथे खेळविली जाणार आहे. या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार असून या स्पर्धेत १० फ्रँचायझी असणार आहेत. खेळाडूंचा लिलाव २ लाख, ५ लाख व १० लाख या श्रेणीमध्ये होणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीकडे २४ खेळाडूंचा संघ असणार आहे.
पुरुष संघांच्या फ्रँचायझी : चेन्नई – चार्ल्स ग्रुप, लखनौ – यदु स्पोर्ट्स, पंजाब – जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, पश्चिम बंगाल – श्राची स्पोर्ट्स, दिल्ली – एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, ओडिशा – वेदांत लिमिटेड, हैदराबाद – रिझोल्युट स्पोर्ट्स, रांची – नवोयम स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड.
Shanghai Masters 2024 : बोपण्णा-डोडिग जोडीची दुसऱ्या फेरीत धडक….
महिला संघांच्या फ्रँचायझी : हरियाणा – जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, पश्चिम बंगाल – श्राची स्पोर्ट्स, दिल्ली – एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, ओडिशा – नवोयम स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड.





