Hockey India Jr. Men National Championship 2024 : पंजाब संघानं पटकावलं विजेतेपद…

Hockey India 14th Junior Men National Championship 2024 – पंजाब संघाने उत्तर प्रदेश संघाला शूटआऊटमध्ये ४-३ असे पराभूत करताना कनिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत ३-३ अशी बरोबरी साधली होती. यामध्ये पंजाब संघाकडून सुखविंदर सिंगने पाचव्या मिनिटाला, जरमन सिंगने ३३ व्या मिनिटाला तर जोबनप्रीत सिंगने ३९ व्या मिनिटाला पंजाब संघाकडून गोल केले. उत्तर प्रदेश संघाकडून अजित यादवने ३१ व्या मिनिटाला, सूरज पालने ४८ व्या मिनिटाला तारा आकाश पालने ५४ व्या मिनिटाला गोल करताना बरोबरी साधली होती.
Final Results from the 14th Hockey India Junior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/zL76d9RFNt— Hockey India (@TheHockeyIndia) September 19, 2024
त्यानंतर झालेल्या शूटआउटमध्ये उत्तर प्रदेशच्या आकाश पाल, नितीश भारद्वाज आणि अजित यादव यांनी गोल केले. पंजाबच्या जपनीत सिंग, सुखविंदर सिंग, जरमन सिंग आणि लवनूर सिंग यांनी गोल करून त्यांच्या संघाचे विजेतेपद निश्चित केले.
Ind vs Ban 1st Test : अश्विन-जडेजाची विक्रमी भागीदारी, मोडित काढला 24 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड….
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये हरियाणा संघाने कर्नाटकला ५-० असे एकतर्फी पराभूत केले. हरियाणा संघाकडून अमित खासा (30 मिनिट), नवराज सिंग (50 मिनिट), नितीन (54 मिनिट), मनीष कुमार (55 मिनिट) आणि साहिल रुहल (59 मिनिट) यांनी गोल करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला.





