Hockey (14th Junior National Championship 2024) : झारखंड, ओडिसा उपांत्यपूर्व फेरीत दाखल…

Hockey India (14th Junior National Championship 2024) :- झारखंड, ओडिसा संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना कनिष्ठ गटाच्या १४ व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.
झारखंड संघाने गुजरात संघाचा २७-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एडिसन मिंजने ६, घुमान लोहराने ५, रोशन एक्का व दीपक सोरेंग यांनी प्रत्येकी ४, बराईक कमल चिकने ३, सुखनाथ गुरियाने २ तर अभिषेक तिग्गा, सुमित बर्वा व मंगरा दोहद्रे यांनी प्रत्येकी १ गोल करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.
Day 6 Results from the 14th Hockey India Junior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/nsYfsx9dZY— Hockey India (@TheHockeyIndia) September 15, 2024
ओडिसा संघाने दादरा- नगर हवेली – दमण दीव संघाचा ५-२ असा पराभव केला. ओडिशाकडून करण लाक्राने २ तर कर्णधार जसमन मुंडा, अभिषेक टोपनो व दीपक प्रधान यांनी प्रत्येकी १ गोल केला. पराभूत संघाकडून प्रदीप मंडल व विस्लॉन झॅक्सा यांनी गोल करून लढत देण्याचा प्रयत्न केला.
कर्णधार अरुण प्रीत सिंग व जाहिद शाबीर यांच्या प्रत्येकी २ गोलच्या जोरावर जम्मू काश्मीर संघाने राजस्थान संघाला ६-२ असे पराभूत केले. जतवीर सिंग आणि जगमीत सिंग यांनी देखील गोल करून जम्मू काश्मीर संघाची आघाडी वाढविली. राजस्थानकडून अनुराग सुथार व कुणाल कौंडल यांनी प्रत्येकी १ गोल केला.





