Diamond League 2024 Final ( Neeraj Chopra) : ब्रुसेल्स, बेल्जियम येथे शनिवारी झालेल्या डायमंड लीग फायनल 2024 मध्ये जागतिक विजेत्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. त्याचे विजेतेपद अवघ्या एका सेंटीमीटरने हुकले. नीरज चोप्रा 2022 मध्ये डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. तथापि, काल झालेल्या अंतिम फेरीत किंग बाउडोइन स्टेडियमवर त्याचा 87.86 मीटरचा दुसरा थ्रो सर्वोत्तम ठरला.
डायमंड लीगच्या अंतिम फेरीत एकूण 7 भालाफेकपटू सहभागी झाले होते. पॅरिस 2024 ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पहिले डायमंड लीग विजेतेपद जिंकले. 2023 युरोपियन गेम्स चॅम्पियन जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले. 2023 डायमंड लीग चॅम्पियन, चेकियाचा जेकब वडलेजचा प्रवेश यादीत समावेश करण्यात आला नाही आणि त्याची जागा बेल्जियमच्या टिमोथी हर्मनने घेतली, जो 76.46 मीटर थ्रोसह शेवटच्या स्थानावर राहिला.
डायमंड लीग फायनलमधील नीरजचे सर्व थ्रो…
पहिला थ्रो- – 86.82 मीटर
दुसरा थ्रो- 83.49 मीटर
तिसरा थ्रो- 87.86 मीटर*
चौथा थ्रो- 82.04 मीटर
पाचवा थ्रो – 83.30 मीटर
सहावा थ्रो- 86.46 मीटर
Neeraj Chopra Brilliant Throw of 87.86m 💥
He finishes as Runner up of Diamond League 2024 , Just short of 1 cm from Champion Peters 💔
Despite Groin Injury, Neeraj gave his best 🇮🇳👏pic.twitter.com/rbmzBNOXRj
— The Khel India (@TheKhelIndia) September 14, 2024
डायमंड लीगच्या फायनलमध्ये खेळण्याची नीरज चोप्राची ही पाचवी वेळ होती. त्याने 2017 मध्ये सातवे, पुढच्या वर्षी (2018) चौथे स्थान आणि 2022 मध्ये 88.44 मीटर थ्रो करून डायमंड लीगचे विजेतेपद जिंकले होते. गेल्या वर्षी (2023) नीरज चोप्राने 83.80 मीटरच्या थ्रोसह जेकब वडलेचच्या नंतर दुसरे स्थान पटकावले होते.
दरम्यान, डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनल्यास खेळाडूंना पदक मिळत नाही. मात्र विजेत्या खेळाडूला प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफी, तीन हजार अमेरिकी डाॅलर(US$30,000 ) बक्षीस रक्कम आणि जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी वाइल्ड कार्ड मिळते.
फ्रॅक्चर असून देखिल स्पर्धेत सहभागी
नीरज चोप्राने सोशल मीडिया हँडलवर खुलासा करताना सांगितले की, मी सोमवारी सराव करताना जखमी झालो. यावेळी एक्स-रे मध्ये माझ्या डाव्या हाताच्या चौथ्या बोटाच्या हाडांमध्ये फ्रॅक्चरझाल्याचे समोर आले. हे माझ्यासाठी आणखी मोठे वेदनादायक आव्हान होते. तरी देखील मी माझ्या टीमच्या मदतीने अंतिम फेरीत उपस्थित राहू शकलो.