Tokyo Olympics : द ग्रेट वॉल ऑफ इंडिया; सविताने वाचवले तब्बल सात गोल
Updated On:

टोकियो – भारताच्या महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया हिला आता द ग्रेट वॉल ऑफ इंडिया असे संबोधले जाऊ लागले आहे.
सविताने पहिल्या तीन सामन्यांतील चुकांमधून शिकत नंतरच्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघाविरुद्ध होणार असलेले गोल वाचवले व संघाच्या विजयातही मोलाचा वाटा उचलला.
सोमवारच्या सामन्यातही तिने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे गोल करण्याचे तब्बल नऊ प्रयत्न फोल ठरवले. हे सगळे पेनल्टी कॉर्नर होते, त्यामुळेच तिच्या कामगिरीचा वाटा सर्वांत जास्त समजला जात आहे.
या सामन्याच्या अखेरच्या मिनिटालाही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, सविताने तोही अपयशी ठरवला.





