पुणे जिल्हा : मुळशीतील आपत्ती व्यवस्थापन टीमने वाचवले पाच जणांनाचे प्राण
Updated On:

पौड : पुण्यात मागच्या २४ तासापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यातच अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुळशीतील आपत्ती व्यवस्थापन टीमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
वळकी नदीने आपली पातळी ओलांडली असून जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून सावरगाव ता. मुळशी येथे नदीच्या किनारी एक गोठ्यात मध्ये अडकलेल्या पाच जणांना आपत्ती व्यवस्थापन टीम ने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
यामध्ये एक महिला, एक पुरुष व तीन मुलांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे. यावेळी स्थानिक पातळीवर असलेले प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे दिसून आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मुळशी चे प्रमोद बलकवडे, गोरख माझिरे व आपत्ती व्यवस्थापन ची टीम उपस्थीत होती.





