‘हिरामंडी’मधील अभिनेत्री शर्मिन सहगल लवकरच होणार आई

Sharmin Segal | ‘हिरामंडी’ या वेब सीरिज मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन प्रेग्नेंट असून लवकरच तिच्या घरी पाळणा हलणार आहे. शर्मिन ही बॉलिवू़डचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. त्यामुळे आता संजय लीला भन्साळी आजोबा होणार आहेत.
विकी लालवानी याने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘भन्साळी आणि सहगल यांच्या कुटुंबाच्या घरी एक आनंदाची बातमी येत आहे. शर्मिन लवकरच आई होणार आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
शर्मिन सध्या तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि तिची प्रसूती लवकरच होणार आहे. शर्मिन सहगल सध्या गरोदरपणामुळे अभिनयापासून दूर आहे. परंतु प्रसूतीनंतर ती लवकरच कामावर परतणार आहे.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती चित्रपट निर्माते दीपक सहगल आणि बेला भन्साळी यांची मुलगी आणि संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. ती २०२४ मध्ये ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सिरीजमध्ये झळकली होती. तिने ‘आलमझेब’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले.
दरम्यान, शर्मिनने नोव्हेंबर २०२३ मध्ये लंडनमध्ये उद्योगपती अमन मेहताशी लग्न केले. लग्नाच्या दीड वर्षानंतर हे जोडपे आई-बाबा होणार आहे.
हेही वाचा :
रशियात पुन्हा मोठी खळबळ; मॉक्सोत भरदिवसा लेफ्टनंट जनरलची हत्या, पुतिनच्या खास माणसाचा स्फोटात मृत्यू





