‘हिरामंडी’ फेम अभिनेत्याने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट

Tana Shah Met Hollywood Star Tom Cruise | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ या वेबसिरिजला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेबसिरिजमुळे अभिनेता ताहा शाह चांगलाच चर्चेत आला. यानंतर आता आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या ताहा शाहची इच्छा पूर्ण झाली आहे. ताहाची त्याच्या हॉलीवूड स्टारला भेटण्याची पूर्ण झाली आहे. नुकतंच त्याने टॉम क्रूझसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे स्वप्नच सत्यात उतरलं असल्याची भावना ताहाने व्यक्त केली आहे
ताहाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली आणि टॉमसोबतचा एक अप्रतिम फोटो आणि व्हिडिओही शेअर केला आहे. ‘कोणीतरी मला चिमटा काढा, आताच माझ्या आदर्श व्यक्तीला भेटलो. एकमेव टॉम क्रुझ.” असं कॅप्शन त्याने दिलं आहे. यावेळी ताहा तो टॉम क्रूझला भेटल्याने खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. सध्या ताहा लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये ताहा स्टार टॉम क्रूजशी बोलत बोलताना दिसत आहे. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. टॉमला भेटून तो किती आनंदी आहे हे ताहाच्या चेहऱ्यावरचे हास्य दर्शवते. ताहाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘स्माइल सर्वकाही सांगते.’ असे म्हंटले आहे. दरम्यान, टॉम क्रुझ लवकरच ‘मिशन इम्पॉसिबल 8’ मध्ये दिसणार आहे. त्याने नुकतंच लंडनमध्ये ‘ट्विस्टर्स’ या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. इथेच दोघांची भेट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Tana Shah Met Hollywood Star Tom Cruise |
संजय लीला भन्साळी यांची प्रसिद्ध वेब सिरीज ‘हिरामंडी’ला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल मेहता आणि ताहा शाह बदुशा यांच्याशिवाय फरीदा जलाल, शेखर सुमन, फरदीन खान, श्रुती शर्मा आणि अध्यायन सुमन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण ताहा शाह बदुशाबद्दल ताजदारची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. Tana Shah Met Hollywood Star Tom Cruise |
हेही वाचा:
ठेकेदाराच्या निष्कजीपणामुळे रस्त्यावरील पाणी दुकानात शिरून लाखोंचे नुकसान





