Hinjawadi News : माण गावात माजी सैनिकांचा सन्मान सोहळा ; सरपंच आर्चना आढाव यांच्या हस्ते गौरव

प्रभात वृत्तसेवा
हिंजवडी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयटीनगरी माण येथील कानिफनाथ सभागृहात देश सेवेसाठी झटणाऱ्या माजी सैनिकांना गौरविण्यात आले .आयटीनगरीच्या सरपंच अर्चना सचिन आढाव यांच्या शुभहस्ते गावातील सर्व सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार भोईर,माजी उपसरपंच तानाजी पारखी, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी माजी सैनिक दगडू ओंकार पारखी, बाळकृष्ण एकनाथ पारखी, शिवाजी नामदेव पारखी, रविंद्र रंगनाथ भोसले, निवृत्ती पाटील, अर्जुन ओझरकर ,मोतीराम पारखी, विलास पारखी यांच्यासमवेत मुळशीतील सर्व माजी सैनिक या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सरपंच अर्चना आढाव यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ चा ढोस पाजून या महिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन हे अभियान आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ मायादेवी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर व वैद्यकीय कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या संपन्न केला.





