हिंगोली: सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात ढगफुटी सदृश पाऊस ; पिकांना मोठा फटका, शेतकरी हवालदिल

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळा आज ढगफुटी सदृश पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाहिलेच तर सोयाबीनचे बोगस बियाणे निघाले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहें होते आणि आत्ता पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मागील दोन दिवसा पासून सततधार पाऊस पडत आहें मात्र आज सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळातील हिवरखेडा धोतरा केलसुला बोरखेडी खडकी या गावात ढगफुटीर सदृश पाऊस पडला. काल संध्याकाळी 7 वाजता पावसाला सुरुवात झाली होती.
सुमारे 30 ते 40 मिनिटात पाऊस पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडुण गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहें अनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले नदी नाले दुथडी भरून वाहत होते.
साखरा येथील गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरात पुराचे पाणी घुसले व काही दुकानात पण पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहें होलगिरा ते बोरखेडी या रस्त्यावरील फुल फुटून गेला आहें त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहें





