हिंगणगाव ग्रामपंचायत दोन हजार झाडांचे वृक्षारोपण करणार; सरपंच अंकुश कोतवाल यांची माहिती
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी): हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दोन हजार झाडांची वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती सरपंच अंकुशराव कोतवाल यांनी दिली आहे.
हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.शिंदेवाडी चे माजी उपसरपंच प्रभाकर जगताप यांनी ग्रामस्थांना वृक्ष उपलब्ध करून दिले होते तर कुंजीर सर यांनी गावात विद्यार्थ्यांच्या साहाय्याने वृक्षारोपण याबाबत जनजागृती केली.
यावेळी एल आय सी चे मॅनेजर सीमा जोशी, ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुशराव कोतवाल, माजी सरपंच विजय गायकवाड,माजी सरपंच कुंडलिक थोरात, भगवान गडदे,भाऊसाहेब चव्हाण,रमेश वेताळ,देविदास पोपळघट, किसन थोरात, काळुराम थोरात, संतोष तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.





