“हिंदू मंदिरांची पुरग्रस्तांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत, पण दर्गा-मशिदी मागे का?”; भाजपचा थेट सवाल

Maharashtra Floods | मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची जमीन खरडून गेली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून पुरग्रस्तांना सावरण्यासाठी आता विविध स्तरांवरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या कठीण प्रसंगी हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असून, अन्न, जीवनावश्यक वस्तू आणि सेवाकार्य हाती घेतले आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली आहे. याशिवाय अनेक मंदिराकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र याबाबत राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत?, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, ‘अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले.’ Maharashtra Floods |
अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली.…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 30, 2025
प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही तर संवेदनशीलतेचा
‘पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत? त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही, एकही ठोस मदतीची जाहीर घोषणा, निधीची उघड माहिती किंवा पूरग्रस्तांसाठी दिलासा का नाही? कधी बोगस हिंदुत्वाचे बेगडी मुखवटे चढवून तर कधी गंगाजमनी तहजीबचे प्रेम दाखवत मंदिरांची टिंगल आणि हिंदूंवर टीका करणाऱ्या लांगूलचालनवादी नेत्यांनी व विचारवंतांनी हे प्रश्न आज स्वत:ला विचारायला हवेत. प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे,’ असे उपाध्ये यांनी म्हंटले आहे. Maharashtra Floods |
पंढरपूरकडूनही मदत
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच पुरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडू प्रसाद, फूड पॅकेट आणि महिलांसाठी रुक्मिणी मातेची महावस्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेगांवच्या गजानन महाराज संस्थानाची मदत
तसेच, शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानानेही 1 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला आहे. Maharashtra Floods |
लालबागच्या राजाकडून 50 लाखांची मदत –
मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडळानेही संकटग्रस्तांसाठी हात पुढे केला असून, 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. Maharashtra Floods |
हेही वाचा :
देशाच्या ‘या’ राज्यांना भूकंपाचे धक्के ; ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे ‘हे’ केंद्र





