महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली स्वरा भास्कर; केले ‘हे’ मोठं आवाहन

मुंबई – गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण आणि महाड या शहरांना बसला. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं आहे.

दरम्यान, या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने पुढाकार घेतला आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलंय.

स्वरा भास्कर म्हणाली, “महाराष्ट्रातील गरजू पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांना सलाम. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नाहीये. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठं काम करणाऱ्या युथ फॉर डेमॉक्रसीला मदत करावी. कृपया दान करा.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.