जेएनयू हल्ल्याची ‘हिंदू रक्षा दल’ने स्विकारली जबाबदारी

संघटनेच्या अध्यक्षाचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर दोन दिवसांपुर्वी झालेल्या जीवघेण्याच्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर ऊर्फ पिंकी चौधरी याने याची माहिती दिली. आपण हिंदू रक्षा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याद्वारे त्याने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
Govt Sources: Claims made by Hindu Raksha Dal Chief Pinky Chaudhary are being investigated. Delhi Police has taken cognizance. To identity masked men in JNU, Police is taking help of video footage as well as face recognition systems https://t.co/oJgxo03IDv
— ANI (@ANI) January 7, 2020
व्हायरल व्हिडिओत चौधरीने विद्यापीठातील कृत्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्याविषयी बोलताना, जे कोणी लोक देशविरोधी कृत्ये करतील त्याचा परिणाम जेएनयूतील विद्यार्थ्य्यांप्रमाणे असेल. जेएनयूत रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आमच्या धर्माविरोधात इतकं चुकीचं बोलणं योग्य नाही. अनेक वर्षांपासून जेएनयू कम्युनिस्टांचा अड्डा बनला असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
चौधरीने यात दावा केला आहे की, जेएनयूमध्ये रविवारी जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सर्वजण हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते. पिंकी चौधरी याच्याविरोधात यापूर्वी देखील हिंसाचाराप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ल्यासह इतर अनेक प्रकरणात चौधरीने तुरुंगवास भोगला आहे. दरम्यान, चौधरीच्या या दाव्याची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.




