Nagar | संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा
Updated On:

कोपरगाव, (प्रतिनिधी): संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांचे संकल्पनेतून हिंदी दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात द्रोणा अकॅडमी साकुरी, संत जनार्दन महर्षी विद्यालय कोपरगाव, संजीवनी अकॅडमी कोपरगाव, रेनबो स्कूल कोपरगाव आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रभाषेचा सन्मान केला.
प्रमुख अतिथी डॉ. संजय दवंगे यांनी हिंदी भाषेची जागतिक ओळख आणि तिचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी कविता वाचन आणि भाषण सादर करून हिंदी भाषेप्रती आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केले. मुख्याध्यापिका सुधा सुब्रमण्यम यांनी आभार मानले. मुख्य शिक्षिका रेखा साळुंके यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





