Himachal Pradesh : मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू
Updated On:

चंडीगड :- मागील 25 जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सूनचे आगमन झाले. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत.
चार घरांचे पूर्ण नुकसान झाले तर 63 घरांचे अंशत: नुकसान झाले. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा यांनी अंदाजे 104 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.
सिमला हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा यांनी सांगितले की, राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जून संपेपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.





