Israel-Hezbollah War : हिज्बुल्लाने इस्त्रायलवर २० रॉकेट डागले; लष्करी तळाला लक्ष्य केल्याचा दावा

Israel-Hezbollah War – इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, हिजबुल्लाहने दावा केला आहे की त्यांनी तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इराण समर्थित गटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी इस्रायलच्या राजधानीत असलेल्या नीरित भागावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
टेलीग्रामवरील एका पोस्टमध्ये, लेबनीज गटाने म्हटले आहे की त्यांनी गाझामधील पॅलेस्टिनींशी एकता म्हणून आणि लेबनीज लोकांच्या संरक्षणाच्या समर्थनार्थ हा नवा हल्ला केला. अल जझीराच्या सनद एजन्सीने सत्यता पडताळणी केलेल्या व्हिडिओनंतर हिजबुल्लाचे वक्तव्य आले आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्यादरम्यान तेल अवीवभोवती सायरन वाजले. सध्या या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. अल जझीराने इस्रायली माध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, हिजबुल्लाहच्या हवाई हल्ल्यानंतर बेन गुरियन विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि इस्रायली सैन्याने तेल अवीव परिसरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.
इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहने तेल अवीवच्या दिशेने किमान 20 रॉकेट डागल्याची पुष्टी केली आहे. आकाशात उडणाऱ्या रॉकेटचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इस्रायली मीडियाने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की इंटरसेप्टरचे तुकडे उत्तर इस्रायलच्या मॅगन मायकल शहरात पडले, ज्यामुळे इमारतीचे तसेच वाहनांचे नुकसान झाले.
हिजबुल्लाहने सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्याने तेल अवीवच्या उपनगरात असलेल्या लष्करी गुप्तचर युनिट 8200 च्या गिलोट तळाला लक्ष्य केले. त्यांनी असेही म्हटले की त्यांनी हैफाजवळील नौदल तळाला लक्ष्य केले.





