Hero Bike: ऑफ-रोडिंगचा बादशाह! हिरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पाहा फीचर्स-किंमत

Hero Xpulse 200 4V Pro Dakar Edition Launched: Hero MotoCorp ने भारतीय बाजारात आपली नवीन बाईक Hero Xpulse 200 4V Pro Dakar Edition ला लाँच केले आहे. हिरोच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.67 लाख रुपये आहे. या स्पेशल एडिशनचे बुकिंग देखील सुरू झाले आहे. नवीन बाईक XPulse 200 4V प्रोचे अपग्रेडेड व्हर्जन असून, याची किंमत 3 हजार रुपये जास्त आहे.
Hero Xpulse 200 4V Pro Dakar Edition चे डिझाइन
नवीन मॉडेल XPulse 200 4V Pro व्हर्जनवर आधारित आहे. यामध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट दिले आहेत. यामध्ये इंधन टँकवर नवीन डकार लोगो, बाइक ड्यून बुशिंग सिल्हूट आणि जास्त स्टोरेज एलिमेंट दिले आहेत. याशिवाय, साइड आणि टेल पॅनेलवर नवीन ग्राफिक्स देखील दिले आहे.
Hero Xpulse 200 4V Pro Dakar Edition चे फीचर्स
या बाइकमध्ये 250 मिमी ट्रॅव्हलसह अॅडजस्टेबल फ्रंट सस्पेंशन मिळते. याचे ग्राउंड क्लिअरेंस 270 मिमी. आहे. बाइक Road, Off-Road आणि Rally या तीन राइडिंग मोडमध्ये येते. याशिवाय, सेफ्टीसाठी एबीएस देखील दिले आहे.
यात रॅली-स्टाइल विंडशील्ड, क्लोज्ड-लूप नकल गार्ड आणि एक यूएसबी चार्जर देण्यात आले आहे. तसेच, राइडिंगचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी हँडलबार राइजसह अॅर्गोनॉमिक्स अपडेट दिले आहे.
हिरोची ही नवीन बाइक फ्रंटला 21 इंच आणि रियरला 18 इंच वायर-स्पोक व्हील्ससह येते. तसेच, मागे व पुढे दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. इंजिनबद्दल सांगायचे तर यात 199.6cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन दिले असून, हे इंजिन 8,500rpm वर 18.9 bhp पॉवर आणि 6,500rpm वर 17.35 Nm टॉर्क जेनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. बाईकचे बुकिंग सुरू झाले असून, पुढील काही आठवड्यात ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी देखील केली जाणार आहे.





