GST Rate Cut : हिरो, होंडा, बजाज, रॉयल एनफील्डच्या बाइक्स 10-25 हजारांनी स्वस्त, पाहा संपूर्ण यादी

GST Rate Cut : भारतातील जवळपास 98% दुचाकी बाजार 350cc पर्यंतच्या स्कूटर आणि दुचाकींचा आहे. आता GST 2.0 अंतर्गत 28% वरून 18% GST कमी झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिरो स्प्लेंडर, होंडा अॅक्टिव्हा, बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे आणि रॉयल एनफील्ड क्लासिक 350 यांसारख्या लोकप्रिय बाइक्स आता स्वस्त होणार आहेत.
किफायतशीर दुचाकी खरेदीदारांना दिलासा –
GST 2.0 मुळे 350cc पर्यंतच्या स्कूटर आणि बाइक्सवर आता फक्त 18% GST लागेल. यामुळे या वाहनांच्या किंमतीत कपात होईल. सणासुदीच्या काळात या बदलामुळे खरेदीदारांना 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
प्रमुख बाइक्सवरील सवलत –
हिरो स्प्लेंडर: 15,743 रुपयांपर्यंत स्वस्त, कमी EMI
होंडा अॅक्टिव्हा: 18,800 रुपयांपर्यंत स्वस्त, शहरी कुटुंबांसाठी सोयीस्कर
बजाज प्लॅटिना: 15,000 रुपयांपर्यंत स्वस्त, लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण प्रवाशांसाठी उत्तम
टीव्हीएस अपाचे: 24,500 रुपयांपर्यंत स्वस्त, गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी कपात
रॉयल एनफील्ड क्लासिक 350: 22,000 रुपयांपर्यंत स्वस्त, रायडिंगच्या शौकीनांसाठी आकर्षक
होंडाच्या दुचाकींवरील कपात (350cc पर्यंत)
शाइन 100: 5,672 रुपयांनी स्वस्त
शाइन 100 DX: 6,256 रुपयांनी स्वस्त
लिव्हो 110: 7,165 रुपयांनी स्वस्त
शाइन 125: 7,443 रुपयांनी स्वस्त
SP125: 8,447 रुपयांनी स्वस्त
CB125 हॉर्नेट: 9,229 रुपयांनी स्वस्त
युनिकॉर्न: 9,948 रुपयांनी स्वस्त
SP160: 10,635 रुपयांनी स्वस्त
हॉर्नेट 2.0: 13,026 रुपयांनी स्वस्त
NX200: 13,978 रुपयांनी स्वस्त
CB350 H’ness: 18,598 रुपयांनी स्वस्त
CB350RS: 18,857 रुपयांनी स्वस्त
CB350: 18,887 रुपयांनी स्वस्त
टीप: हिमालयन, KTM आणि ट्रायम्फ यांसारख्या बाइक्सना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
सणासुदीच्या काळात खरेदीची सुवर्णसंधी –
या GST कपातीमुळे दुचाकी खरेदीदारांना सणासुदीच्या काळात मोठी बचत होणार आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि ग्रामीण खरेदीदारांसाठी ही मोठी संधी आहे. बाइक खरेदीचा विचार करत असाल, तर आता योग्य वेळ आहे!





