फक्त 80 हजारांच्या बजेटमध्ये आली हिरोची ‘ही’ लोकप्रिय बाइक, वैशिष्ट्ये पाहून नक्कीच खरेदी कराल

2025 Hero Splendor Plus Details | हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्प्लेंडर प्लस बाईकचे 2025 मॉडेल अधिकृतपणे बाजारात सादर केले आहे. यावेळी कंपनीने बाइकमध्ये इंजिन तसेच ठेवले असले तरीही डिझाइनमधील बदलांमुळे स्प्लेंडर अधिक आकर्षक वाटते.
कंपनीने नवीन 2025 Hero Splendor Plus ला वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. विशेष म्हणजे या बाईकची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
2025 हिरो स्प्लेंडर प्लसमध्ये मागील मॉडेलसारखेच 97.2cc चे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड SOHC 2V इंजिन दिले आहे. हे इंजिन आता फेज II OBD-2B उत्सर्जन मानकांनुसार अपडेट करण्यात आले आहे. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले असून, 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते.
नवीन मॉडेलचे एकूण डिझाईन जुनेच असले तरी त्यामध्ये नवीन स्पोर्टी ग्राफिक्स, ठराविक व्हेरिएंटमध्ये अपडेटेड पिलियन ग्रॅब रेल व लगेज रॅक देण्यात आले आहेत. त्यामुळे बाईक अधिक स्टायलिश आणि युझर-फ्रेंडली झाली आहे.
किंमत आणि व्हेरिएंट्स
नवीन स्प्लेंडर प्लस मालिकेत एकूण 6 व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत:
- स्प्लेंडर+ ड्रम ब्रेक
- स्प्लेंडर+ i3S
- स्प्लेंडर+ i3S ब्लॅक अँड ॲक्सेंट
- स्प्लेंडर+ XTEC ड्रम
- स्प्लेंडर+ XTEC डिस्क
- स्प्लेंडर+ XTEC 2.0 ड्रम
2025 Hero Splendor Plus ची किंमत
2025 Hero Splendor Plus ची सुरुवाती किंमत फक्त 79,096 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 85,001 रुपयांपर्यंत (एक्स -शोरूम) जाते. भारतीय बाजारात या नव्या स्प्लेंडरची टक्कर टीव्हीएस स्टार सिटी प्लस, होंडा शाईन 100 आणि बजाज प्लॅटिना 100 यांसारख्या बाइक्सशी होणार आहे.





