…म्हणून यशवंत सिन्हा यांची मुंबई भेट रद्द

मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शनिवारची मुंबई भेट रद्द केली. शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना दिलेला पाठिंबा त्यामागील कारण असल्याचे मानले जात आहे.
सिन्हा मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांशी संवाद साधणार होते. पण, त्यांची भेट रद्द झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देण्यात आली. महाविकास आघाडीचे इतर घटक असणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा सिन्हा यांना पाठिंबा आहे.
राज्यात शिवसेनेचे 18 लोकसभा आणि 3 राज्यसभा खासदार आहेत. त्या पक्षाचे 55 आमदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या बंडखोर गटातील 40 आमदारांनी आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादीचे 53 आमदार आणि लोकसभा, राज्यसभेचे प्रत्येकी 4 खासदार आहेत.
कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत. त्या पक्षाचे राज्यात एकूण 4 खासदार आहेत. त्यातील तिघे राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान होईल. त्या निवडणुकीत मुर्मू आणि सिन्हा यांच्यातच थेट लढत होत आहे.
Presidential Election: द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित, 61 टक्के मते मिळू शकतात




