Boycott Turkey | पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु झाला. या संघर्षात तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला उघडपणे साथ दिली. त्यांनी पाकिस्तानच्या बाजूनं भूमिका घेतल्याने आता बॉयकॉट तुर्की या मोहिमेने देशभरात जोर धरला आहे. पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानला भारतीय व्यापाऱ्यांनी मोठा दणका दिला आहे. भारताने तूर्कीवर मार्बल स्ट्राईक केला आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील व्यापाऱ्यांनी तूर्कीसोबतचा व्यापार बंद केला आहे. मार्बल व्यापाऱ्यांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर आता तूर्कीमधून मार्बल भारतात येणार नाही. Boycott Turkey | उदयपूर हे आशियातील सर्वात मोठे मार्बल निर्यातदार आहे. भारतात आयात होणाऱ्या 70% मार्बल तुर्कीमधून येतो. तूर्कीसोबत व्यापार थांबवल्यानं भारतीय मार्बलची मागणी वाढेल. मार्बलनंतर तूर्कीच्या पर्यटनावर देखील बंदी घालण्यात आली आहे. Boycott Turkey | अझरबैयजान आणि तुर्कीयेतील बुकिंग ६० टक्के कमी भारतातून तुर्की आणि अझरबैजानला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. २०१४ मध्ये केवळ ४८०० भारतीय अझरबैजानला गेले होते. २०२४ मध्ये हाच आकडा थेट २.४३ लाखांवर जाऊन पोहोचला. याचवर्षी ३.३ लाख भारतीयांनी तुर्कीला भेट दिली होती. मात्र आता अझरबैयजान आणि तुर्कीयेतील बुकिंग ६० टक्के कमी झालं आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये एकूण बुकिंग रद्द करणाऱ्यांची संख्या २५० टक्के वाढली आहे. Boycott Turkey | तुर्कीच्या वस्तू, फळांवरही बहिष्कार याशिवाय तुर्कस्तानहून भारतात येणाऱ्या वस्तू, फळांवरही बहिष्कार घालण्यात आला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरुन आयात करण्यात आलेल्या सफरचंदांची विक्री बंद केली आहे. तर भारतात जे संगमरवर येतं त्यातलं ७० टक्के भाग तुर्कस्तानातून येतो. मात्र आता आयात देखील बंद केली आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणं तूर्कीला चांगलंच महागात पडणार आहे. कारण पर्यटन असो किंवा तूर्कीएसोबतचा व्यापार यामुळे तूर्कीला मोठा फायदा होत होता. मात्र, आता पाकिस्तानला साथ दिल्यामुळे तूर्कीला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. हेही वाचा: चीनची नवी चाल; भारताच्या समुद्र हद्दीत आढळले हेरगिरी करणारे जहाज; नौदल अॅक्शन मोडवर