पाकिस्तान: लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह चौघांचा मृत्यू
Updated On:

इस्लामाबाद – गिलगीट-बाल्टीस्तानमध्ये आज पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात पाकिस्तानी सैन्याचे चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर गिलगीट बाल्टीस्तानमध्ये झालेल्या अपघातातील पीडीतांच्या सुटकेसाठी पाठवण्यात आले होते, असे पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गिलगीट बाल्टीस्तानमधील अस्टोर जिल्ह्यातल्या मिनिमांग भागात हे हेलिकॉप्टर कोसळले असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अपघातात वैमानिक, सहवैमानिकासह दोन सैनिक मारले गेले. हेलिकॉप्टरला झालेला हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला होता, असेही या निवेदनात म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानचे माहितीमंत्री फतुदुल्ला खान यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.





